गुरुवार, 12 फ़रवरी 2009

वतन

//दुरिताचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसुर्ये पाहो //


जन्मोजन्मी तुझी /करावी चाकरी/
तू द्यावी भाकरी /पांडुरंगा//१//

साडे तीन हात /आमचे वतन /
करावे जतन /तुझे तूच //२//

बोलविता तूच /आम्ही बरळावे /
तूच पाठवावे /गावोगावी //३//

गोड तुझे रूप /आम्ही आठवावे /
म्हणुन दिसावे /जागोजागी //४//

नारायणा तुज /कसली ही हाव /
आम्हा किती जीव /लावतोस //५//